पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले केजरीवाल कोसळले मंचावरुन

पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले केजरीवाल कोसळले मंचावरुन

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ९ वर्षांच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या चिमुरडीच्या हत्येनंतर मृतदेहावर नातेवाईकांच्या परवानगीशिवायच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या या भेटीवेळी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, केजरीवाल जेंव्हा तिथल्या लोकांना संबोधित करण्यासाठी स्टेजवर चढले तेंव्हा त्या स्टेजवरची गर्दी इतकी वाढली की तो स्टेजच तुटला. स्टेज तुटल्यानंतर स्टेजवरील मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासहित सगळेच लोक खाली कोसळले. मात्र, यानंतर लगेचच केजरीवाल यांना त्या गर्दीतून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर ते त्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले केजरीवाल कोसळले मंचावरुन
'प्रेरणा'दायी! दोन मुलांच्या आईने ४४ व्या वर्षी IIM मध्ये मिळवली सुवर्णपदकं
पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले केजरीवाल कोसळले मंचावरुन
‘छळ ही आत्महत्येसाठी चिथावणी नाही’

त्यांनी म्हटलंय की, या लहानगीसोबत झालेल्या अन्यायाबाबत अतिव दु:ख आहे. लहानगीला परत आणलं जाऊ शकत नाही मात्र, दिल्ली सरकार पीडित कुटुंबाच्या सोबत उभे आहे. दिल्ली सरकार पीडित कुटुंबाला १० लाख रुपये मदत म्हणून देईल. सोबतच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

या प्रकरणी दिल्ली सरकार चांगल्यातले चांगले वकील देखील देईल जेणेकरुन आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकेल. केंद्र सरकारला देखील विनंती आहे की त्यांनी या प्रकरणी कडक पावले उचलावीत, यामध्ये दिल्ली सरकार त्यांना पूर्ण मदत करेल, असंही त्यांनी म्हटलंय.

मात्र, आता या घटनेवरून भाजपा आणि आप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे लोक तेथील वातावरण बिघडवत आहेत, असे दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com