हिंदू-मुस्लीम भेदभाव पाकिस्तानमध्ये; अझरुद्दीन तर आमचा कॅप्टन होता!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

पाकिस्तानच्या क्रिकेट संघात युसूफ योहाना हा एक दैवी देणगी असलेला क्रिकेटपटू होता. तो इसाई धर्माचा असल्याने त्याच्याशीही अनेकांनी दुर्वतन केले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) वरून देशभरात अनेक आंदोलने झाली. सोशल मीडियात अजूनही हिंदू-मुस्लीम धर्मावरून अनेक वाद-विवाद सुरू आहेत. यावर आता भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गंभीर म्हाणाला, हिंदू-मुस्लीम भेदभाव हा फक्त पाकिस्तानमध्येच केला जातो. भारतामध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाते. सध्या इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत, कधी काळी ते पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे कर्णधारही राहिले, पण त्यांच्या सत्ताकाळात हिंदू-मुस्लीमांमध्ये भेदभाव केला जात असेल, तर हे नक्कीच लाजिरवाणे आहे. 

तो पुढे म्हणाला, भारतामध्ये हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला जात नाही. असे जर होत असते, तर मोहम्मद अझरुद्दिन भारतीय संघाचा कर्णधार झाला नसता. 

- अर्पिताने सलमानला दिलं सगळ्यात स्पेशल 'बर्थडे गिफ्ट'!

गंभीरने हे वक्तव्य असे अचानक का केले? असे तुम्हाला वाटत असेल. याला कारणही तसेच आहे. गुरुवारी (ता.26) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने केलेल्या वक्तव्याचा समाचार गंभीरने घेतला. पाकचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया हिंदू असल्याने संघातील अनेक खेळाडू त्याच्याशी गैरवर्तन करत, असा खळबळजनक गौप्यस्फोट शोएब अख्तरने केला होता. 

- पाकला दाखवली लायकी; गांगुलींनी उचललं 'हे' मोठं पाऊल

एएनआयशी बोलताना कनेरिया म्हणाला, शोएब अख्तरने जे काही सांगितले ते खरे आहे. पाक संघातील काही खेळाडू मी हिंदू असल्याने माझ्यासोबत कधी जेवण करत नसत. मी हे कधीच बोलणार नव्हतो. ही माहिती सर्वांपुढे यावी, असे मला वाटत नव्हते. मात्र, यापुढे मी गप्प बसणार नाही. 

'गेम ऑन है' या टेलिव्हिजन शोमध्ये अख्तर म्हणाला, दानिश  कनेरिया हिंदू असल्याने त्याच्यावर कायम अन्याय झाला. त्याने संघासाठी अनेक सामने आणि मालिका जिंकवून दिल्या, पण पाकिस्तानी खेळाडूंनी त्याच्याशी कधीही मैत्री केली नाही. उलट त्याला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. या सर्व प्रकारामुळे दानिशने क्रिकेट कारकीर्दीतून काढता पाय घेतला. 

- ICCची क्रमवारीची पद्धत म्हणजे निव्वळ कचरा : मायकेल वॉन

या कार्यक्रमस्थळी पाकिस्तानचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूही होते. अख्तर पुढे म्हणाला, पाकिस्तानच्या क्रिकेट संघात युसूफ योहाना हा एक दैवी देणगी असलेला क्रिकेटपटू होता. तो इसाई धर्माचा असल्याने त्याच्याशीही अनेकांनी दुर्वतन केले. परिणामी, त्याला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला. क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा इतर अनेक गोष्टींमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचे जास्त लक्ष्य असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danish Kaneria remark shows real face of Pakistan says BJP MP Gautam Gambhir