प्रियकर-प्रेयसीने सोडला सासूच्या अंगावर नाग अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

जयपूर (राजस्थान): प्रेमात अडसर ठरत असलेल्या सासूच्या अंगावर नाग सोडल्यामुळे सासूचा मृत्यू झाल्याची घटना बुहाना जिल्ह्यातील सागवा गावामध्ये घडली. सासूच्या मृत्यूनंतर सात महिन्यानंतर पोलिसांना तपास करण्यात यश आले आहे.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

जयपूर (राजस्थान): प्रेमात अडसर ठरत असलेल्या सासूच्या अंगावर नाग सोडल्यामुळे सासूचा मृत्यू झाल्याची घटना बुहाना जिल्ह्यातील सागवा गावामध्ये घडली. सासूच्या मृत्यूनंतर सात महिन्यानंतर पोलिसांना तपास करण्यात यश आले आहे.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागवा गावामध्ये सासू व सून दोघीच राहात होत्या. सासूचा पती दुसरीकडे नोकरी करत आहे तर मुलगा लष्करात सेवेत आहे. सुन सतत फोनवर बोलत असल्याचे सासूच्या लक्षात आले. यामुळे सासूने सुनेला समजावून सांगितले होते. परंतु, सून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. प्रेमात बुडालेल्या सुनेने आपल्या संशयाबद्दल प्रियकराला सांगितले. प्रेमात अडसर ठरत असलेल्या सासूचा काटा काढण्याचे दोघांनी ठरवले. दोघांनी सासूच्या खोलीत नाग सोडला. नागाने दंश केल्यामुळे सासूचा मृत्यू झाला. यानंतर साप चावल्यामुळे सासूचा मृत्यू झाल्याचे तिने नातेवाईकांना सांगितले. सासूचा मृत्यू झाल्यानंतर सुनेचे प्रेम प्रकरण वाढत गेले. सासरकडील व्यक्तींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सून अल्पना व तिचा प्रियकर विशाल करधनीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी सासूच्या खुनाची कबूली दिली. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव; वृद्धही रांगेत...

अल्पनाचा 12 डिसेंबर 2018 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. दोन जून रोजी सासूला नाग चावल्यामुळे मृत्यू झाला होता. पण, त्या दिवशी अल्पना व विशालमध्ये तब्बल 124 वेळा मोबाईलवरून संभाषण झाले होते. दोघांमध्ये एवढ्या वेळा संभाषण झाल्यामुळे पोलिसांना संशय आला आणि दोघांना ताब्यात घेण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले.

Video: दारूड्याचा अर्धा तास कोब्रासोबतचा थरार पाहाच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughter in law and lover got her mother in law killed by snake at rajasthan