कुख्यात डॉन दाऊद कराचीमध्येच; भाचा अलीशाहा पारकरचा दावा | Dawood Ibrahim | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dawood Ibrahim

कुख्यात डॉन दाऊद कराचीमध्येच; भाचा अलीशाहा पारकरचा दावा

मुंबई : दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा दावा त्याचा भाचा अली शाहाने केला आहे. दाऊदच्या ठिकाण्यासंदर्भात हसीना पारकरच्या मुलाला प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर त्याने ईडीला ही माहिती दिली आहे. तसेच सणासुदीला दाऊदची पत्नी कुटुंबीयांशी संपर्क करत असल्याची माहिती हसीना पारकर (Haseena Parkar) हीचा मुलगा आणि कुख्यात डॉन दाऊदचा भाचा अली शाहा याने दिली आहे.

(Dawood Ibrahim News Update)

हेही वाचा: 'बृजभूषण अन् योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो': राऊत

ईडीकडून हसीना पारकरच्या मुलाची चौकशी करण्यात येत असताना ही माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्यावर कोर्टात दाखल केलेल्या आरोपातील ईडीच्या चार्जशीटमध्ये ही माहिती आहे. त्यामध्ये दाऊद इब्राहिम याची बायको त्याला संपर्क करते असा दावा अली शाहा यांनी केला आहे.

व्हाईस कॉलवरून दाऊद यांचा परिवार त्यांच्याशी बोलत असल्याचं अली शहा यांनी सांगितलं आहे. ते सणासुदीला आणि इतर वेळी दाऊदसोबत चर्चा करतात असा दावा केल्यार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप

दरम्यान मनी लॉंड्रिंग प्रकरणात कोठडीत असलेल्या नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असल्याचे पुरावे कोर्टाला मिळाले होते. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले होते.

त्याचबरोबर याआधी ईडीने कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये नावाब मलिकांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचं सांगितलं होत. दाऊदची बहिण हसीना पारकर आणि त्यांच्या वारंवार बैठका होत होत्या. गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी त्यांच्या बैठका होत होत्या. त्यासाठी त्यांनी एक माणूसही नेमला होता असं पुराव्यांच्या आधारे समोर आलं होतं

हेही वाचा: Petrol-Diesel Rate: तेल कंपन्यांकडून दिलासा; जाणून घ्या आजचे नवे दर

त्यानंतर ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या हसीना पारकरच्या मुलाने आणखी खुलासे केले आहेत. दाऊद कराचीमध्ये असल्याचा दावा त्याने केला असून तो त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क करत असल्याची माहिती दाऊद भाचा अली शाहा याने दिली आहे.

Web Title: Dawood Ibrahim In Karachi Pakistan Alishaha Parkar Ed Investigation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top