जबरदस्ती धर्मांतरामुळे आत्महत्या करणाऱ्या मुलीचा व्हिडीओ आला समोर

आत्महत्या करणाऱ्या मुलीने वसतिगृहातील वॉर्डनवर गंभीर आरोप केले
suicide case
suicide caseटिम ई सकाळ

तमिळनाडू येथील तंजावरमध्ये एका मुलीनं जबरदस्तीने धर्मांतर केल्यामुळे विष घेत आत्महत्या केली होती. होती. विष प्यायल्यानंतर १० दिवसांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तामिळनाडूमधील वातावरण चांगलंच खवळलं आहे. आता या प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ आत्महत्या करण्यापूर्वीचा आहे. व्हिडीओमुळे या प्रकरणात एक नवीन ट्वीस्ट आले आहे.

suicide case
Video: सुवर्णमंदिराला राहुल गांधींची भेट

या व्हिडिओमध्ये मृत मुलीने वसतिगृहात काम करणाऱ्या वॉर्डनवर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केलाय. वॉर्डन वसतिगृहात काम करायला लावायची आणि त्यामुळे तिचा अभ्यास व्हायचा नाही, अशी तक्रार केल्यानेच शाळेने जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे तर शाळा व्यवस्थापनाने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही धार्मिक श्रद्धांमध्ये कधीही हस्तक्षेप केला नसल्याचे स्पष्ट केले आहेत.

suicide case
दिल्ली: विकेंड कर्फ्यू मागे; राज्यातील निर्बंधांमध्येही होणार बदल?

दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या व्हिडीओचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आणि व्हिडीओचे चित्रीकरणासाठी वापरलेला फोन जमा करण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com