दिल्ली: विकेंड कर्फ्यू मागे; राज्यातील निर्बंधांमध्येही होणार बदल ? | Covid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi

दिल्ली: विकेंड कर्फ्यू मागे; राज्यातील निर्बंधांमध्येही होणार बदल?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi Corona News Update) कमी होणाऱ्या कोरोना (Coronavirus) रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विकेंड निर्बंधांबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी विकेंड कर्फ्यू (Night Weekend curfew In Delhi ) लागू करण्यात आला होता, मात्र रूग्णसंख्या कमी होत असल्याने येथील शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लागू असणारा विकेंड कर्फ्यू (Weekend Curfew) मागे घेण्यात आला आहे. मात्र, रात्रीचा कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय दुकाने उघडण्यासंदर्भातील सम-विषम बंधनेदेखील मागे घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

हेही वाचा: महापालिकेच्या मुख्यसभेला आजारपणाने ग्रासले, महापौर पाॅझिटीव्ह

दरम्यान, महाराष्ट्रात देखील कोरोनाची (Maharashtra Covid Restriction ) रूग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध (Maharashtra Corona Latest News In Marathi ) लागू करण्यात आले होते. मात्र, आता राज्यात देखील नव्या कोरोना बाधितांची संख्या सातत्याने कमी होतानाचे चित्र आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील निर्बंधांमध्ये शिथितला मिळणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (Covid Restriction In Maharashtra)

दरम्यान, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय DDMA च्या पुढील बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार जास्तीत जास्त 200 लोक किंवा 50% क्षमतेसह नागरिकांना विवाहसोहळ्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. बार, रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉलसाठी 50% क्षमतेसह परवानगी देण्याता आली असून, सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Corona New Guideline For Delhi)

Web Title: Weekend Curfew For Covid Curbs Lifted Off In Delhi No Odd Even Restrictions Also For Markets Shops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..