

नवी दिल्ली : भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेली खलिस्तानी संघटना ‘शीख फॉर जस्टीस’ वर लवकर कारवाई करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांच्याकडे केली आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या गबार्ड यांनी सोमवारी सिंह यांची भेट विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी सिंह यांनी वरील मागणी केली.