...म्हणून मी राफेलची पूजा केली : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

राफेलवर ओल्या गंधाने ॐ काढला. त्याला हळदी-कुंकू वाहिले. फुले व नारळ वाहिला. तसेच चाकाखाली लिंबूही ठेवले होते. या सर्व प्रकारामुळे राजनाथ यांना देशभरातून टीकेला सामोरे जावे लागले होते. पण यावर राजनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : विजयादशमी दिवशी भारतीय हवाई दलात राफेल हे लढाऊ विमान दाखल झाले. पण यापेक्षा अधिक चर्चा झाली ती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पूजेची. यावर आता राजनाथ सिंहानी मौन सोडले व आपण राफेलची पूजा का केली याचे कारण सांगितले आहे.

Rafale : श्रद्धा की अंधश्रद्धा? राफेल विमानाखाली लिंबू ठेवल्याने नेटकरी संतापले!

दसऱ्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला हिंदू धर्मात शस्त्रपूजनाची पद्धत आहे. त्याप्रमाणे राफेल आणायला गेलेल्या राजनाथ यांनी राफेलची साग्रसंगीत पूजा केली. राफेलवर ओल्या गंधाने ॐ काढला. त्याला हळदी-कुंकू वाहिले. फुले व नारळ वाहिला. तसेच चाकाखाली लिंबूही ठेवले होते. या सर्व प्रकारामुळे राजनाथ यांना देशभरातून टीकेला सामोरे जावे लागले होते. पण यावर राजनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 'विश्वात अशी एक शक्ती आहे, जिच्यावर माझा लहानपणापासून पूर्ण विश्वास आहे. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आमचा या सर्व गोष्टींवर पूर्ण विश्वास व श्रद्धा आहे.' असे उत्तर राजनाथ सिंह यांनी भारतात आल्यावर दिले.

विरोधकांनी या राफेलच्या पूजा प्रकारावरून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. 'काँग्रेसचे या बाबत वेगळे मत असू शकते. या गोष्टींवर सगळ्यांचे एकमत होईल अशी अपेक्षा अजिबात नाही.' असेही राजनाथसिंह यांनी यावेळी सांगितले.

#RafalePujaPolitics राफेलला पडलं लिंबू महागात! सोशल मीडियावर धुमाकूळ

फ्रान्सचा दौरा संपवून राजनाथ सिंह काल (ता. 10) भारतात परतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'राफेलमुळे भारतीय लष्कराच्या आक्रमकतेत वाढ होईल. राफेल केवळ पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे शक्य झाले' असे राजनाथ यांनी यावेळी सांगितले व राफेलमधील उड्डाणाचा अनुभवही पत्रकारांना सांगितला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence minister Rajnathsingh explains about Rafale pooja after returning India