esakal | दिल्ली पुन्हा हादरली; निर्भयाची पुनरावृत्ती...
sakal

बोलून बातमी शोधा

delhi 13 year old gril nirbhaya situation case again

राजधानीत निर्भयाची पुनरावृत्ती घडली असून, एका 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात सामूहिक बलात्कार करून तिच्या शरिरावर कात्रीने वार केले. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून, या घटनेमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.

दिल्ली पुन्हा हादरली; निर्भयाची पुनरावृत्ती...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: राजधानीत निर्भयाची पुनरावृत्ती घडली असून, एका 13 वर्षीय मुलीवर तिच्याच घरात सामूहिक बलात्कार करून तिच्या शरिरावर कात्रीने वार केले. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून, या घटनेमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.

दिल्लीतील पीरागढी परिसरात सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे समजून दोघे जण पळून गेले. या घटनेनंतर मुलीने शेजाऱयांकडे मदत मागितली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक स्थिर आहे. तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा कहर अन्...

मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीचे कुटुंब हे मूळचं बिहारचे आहे. कामानिमित्त ते दिल्लीत स्थलांतरीत झाले आहे. पीडितेचे आई-वडील व बहीण बाजूच्याच कंपनीत मजूराचे काम करतात. त्यामुळे पीडिता दिवसभर घरात एकटीच राहात होती. दोन तरुण तिच्या घरात घुसले व त्यांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने जोरदार विरोध केला. दोघांनी तिला बेदम मारहाण करत शरीरावर कात्रीने वार करून गंभीर दुखापत केली. मुलीला जखमी केल्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर बेशुद्ध झालेली पीडिता मृत झाल्याचे समजून आरोपी पसार झाले. काही वेळानंतर मुलगी शुद्धीवर आली. गंभीर जखमी असतानाही ती फरफटत शेजारच्या दरवाजापर्यंत गेली. तिच्या आवाजाने शेजारी बाहेर आले. यावेळी तिची अवस्था बघून सगळेच घाबरले. घडलेला प्रकार सांगत असतानाच पुन्हा बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दोघांची नावे सांगितली आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून, नराधमांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

नागीण घेतेय बदला; 26 जणांना डसली अन्...