वादानंतर दिल्ली 'एम्स' बॅकफूटवर; खासदारांना VIP सुविधा देण्याचा आदेश अखेर मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AIIMS Recruitment 2022

वादानंतर दिल्ली 'एम्स' बॅकफूटवर; खासदारांना VIP सुविधा देण्याचा आदेश अखेर मागे

नवी दिल्ली - दिल्ली 'एम्स'ने विद्यमान खासदारांना उपचारांसाठी विशेष वागणूक देण्याचा आदेश मागे घेतले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (एम्स) मुख्य प्रशासकीय अधिकारी देवनाथ साहा यांनी शुक्रवारी लोकसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव वाय.एम. कांडपाल यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे.

हेही वाचा: मोदी आश्वासन बिहारमध्ये देतात अन् इंडस्ट्री गुजरातमध्ये सुरू करतात : प्रशांत किशोर

'दिल्ली एम्समधील खासदारांच्या वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थेसंदर्भातील एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांचे पत्र तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.

एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांनी एम्समधील विद्यमान खासदारांच्या वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थेसंदर्भात लिहिलेले पत्र तातडीने रद्द करण्याबाबत फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन्सने (एफईएमए) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना पत्र लिहिले होते.

हेही वाचा: Himachal Pradesh Election: अन् केंद्रीय मंत्र्यांना अश्रू अनावर...

दिल्लीतील एम्सकडून खासदारांच्या उपचारासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी करण्यात आली होती. या एसओपी अंतर्गत खासदारांच्या उपचार आणि देखभाल व्यवस्थेचा समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र, डॉक्टरांच्या एका गटाने हे 'व्हीआयपी कल्चर' असल्याची टीका केली होती.

टॅग्स :delhiAIIMSAIIMS director