देश
Delhi Air Pollution : दिल्ली जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर, मुंबई चौथ्या क्रमांकावर; श्वास घेणेही झाले कठीण, अहवालाने चिंता वाढवली
AQI India 2025 : नवी दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. मुंबई चौथ्या आणि कोलकाता तिसऱ्या क्रमांकावर असून भारतातील तीन शहरे पहिल्या पाचात आहेत.
Summary
AQI पातळी २०१ ते ४०० दरम्यान राहण्याचा अंदाज असून हवा “अत्यंत वाईट” श्रेणीत आहे.
थंडी, पराळी जाळणे, वाहनांचे धूर आणि बांधकामातील धूळ ही प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत.
परिस्थिती गंभीर असल्याने शाळा बंद, बांधकाम थांबवणे आणि वाहनांवर निर्बंध लागू शकतात.
भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता २१ ऑक्टोबर मंगळवारी धोकादायक पातळीवर घसरली. हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे तर जगातील पहिल्या पाच प्रदुषित शहरांत भारतातील तीन शहरांचा समावेश असून मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.दिवाळीत फटाके फोडल्यामुळे हे घडले.

