

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आयोगाकडून पूर्ण झाली असून ६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस निवडणूक वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.