esakal | दिल्लीचा श्‍वास कोंडण्यास सुरुवात! 
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage-Fire

मॉन्सूनचा कालावधी संपताच आणि हिवाळ्याची चाहूल लागण्याच्याही आधीच राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) २०६ ते २३० या दरम्यान घसरला. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी शेतातच काडीकचरा जाळण्यास प्रारंभ केल्याचा पहिला फटका दिल्लीला आज बसला. आगामी हिवाळ्यात प्रदूषण आकाशाला भिडून दिल्ली पुन्हा गॅस चेंबर बनणार का, अशी आशंका निर्माण झाली आहे.

दिल्लीचा श्‍वास कोंडण्यास सुरुवात! 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - मॉन्सूनचा कालावधी संपताच आणि हिवाळ्याची चाहूल लागण्याच्याही आधीच राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) २०६ ते २३० या दरम्यान घसरला. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी शेतातच काडीकचरा जाळण्यास प्रारंभ केल्याचा पहिला फटका दिल्लीला आज बसला. आगामी हिवाळ्यात प्रदूषण आकाशाला भिडून दिल्ली पुन्हा गॅस चेंबर बनणार का, अशी आशंका निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानीच्या नेमेची होणाऱ्या भीषण प्रदूषणावर उतारा काढण्यासाठी केंद्र व शेजारील राज्य सरकारांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ४८ तासांतच दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणाची कल्हई उडण्यास प्रारंभ झाला हे सूचक मानले जाते.  लॉकडाउन संपताच प्रदूषण पातळी पुन्हा पहिल्यासारखीच वाढू लागली. 

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ

दिल्लीत हिवाळ्यात वातावरणात सर्वत्र विषारी धुराचे साम्राज्य असते. यासाठी कारणीभूत असलेला धूर शेजारच्या राज्यांतील शेतांतून येतो. तेथे नवीन हंगामाआधी काडीकचरा शेतातच जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. तो धूर थेट दिल्लीत येतोे. अस्थमासारख्या विकारांचेच रुग्णच नव्हे तरुण माणसालाही श्‍वास घेणे या काळात कठीण जाते. या समस्येच्या निराकरणासाठी पर्यावरण मंत्रालयाने हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश व राजस्थान या चारही राज्यांबरोबर बैठक घेतली. 

Bihar Election: पहिल्याच घासाला खडा; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मोडली आघाडी 

काडीकचऱ्याचे शेतातच खत
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, शेतातील काडीकचऱ्याचे शेतातच खत करणाऱ्या एका नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. यामध्ये एक कॅप्सूल द्रवपदार्थांत मिसळून त्याचा शिडकावा शेतात केला जातो. यामुळे या काडीकचऱ्याचे शेतातच खतात रूपांतर होते व तण जाळण्याची वेळ येत नाही. ‘पूसा’ ॲग्रिकल्चरल इंन्स्टिट्यूटने हे तंत्रज्ञान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. शेतात काडीकचरा जाळण्याचे प्रकार बंद व्हावेत यासाठी केंद्राने या नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन चारही राज्य सरकारांना केले होते.  

Edited By - Prashant Patil