तीस हजारांच्या उधारीवरून झाला आपमान, त्यानं पाच जणांचं कुटुंबच संपवलं

टीम ई-सकाळ
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पूर्व दिल्लीच्या भजनपुरा भागात गेल्या आठवड्यात एका घरातून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत घडलेल्या एका हत्याकांडामागचं कारण ऐकून, सगळ्यांनाच धक्का बसला आहे. केवळ 30 हजार रुपयांच्या उधारीवरून झालेल्या, अपमानामुळं एका माथेफिरू तरुणानं एक संपूर्ण कुटुंबच संपवून टाकलं. नातेवाईकच असलेल्या त्या कुटुंबातील पाच जणांची त्यानं हत्या केलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तीस हजार रुपये उधारी
याबाबत दिल्ली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूर्व दिल्लीच्या भजनपुरा भागात गेल्या आठवड्यात एका घरातून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यावेळी त्या घरातून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी हत्याकांडाचा तपास सुरू केली. यात शंभूनाथ चौधरी (वय 43), त्यांची पत्नी सुनिता (वय 37), मुलगा शिवम (17) आणि सचिन (14) तर मुलगी कोमल (वय 12) अशा पाच जणांचा हत्या झाली होत. याप्रकरणी शभूनाथ यांचा आतेभाऊ प्रभू चौधरी (वय 28) याला अटक करण्यात आलीय. प्रभू याला हत्याकांडामागचे कारण विचारले असता धक्कादायक बाब समोर आली. शंभूनाथ यांच्याकडून प्रभूने 30 हजार रुपये उधार घेतले होते. पण, त्याला ते पैसे परत करता आले नाही. त्यामुळं शंभूनाथ यांच्या पत्नी सुनीता यांनी त्याचा चार चौघांत अपमान केला होता. या अपमानाचा बदला म्हणून, त्यानं गेल्या आठवड्यात दुपारी साडे तीन वाजता पहिला सुनिता यांची हत्या केली. त्यानंतर त्यानं घरात रात्री 11 वाजेपर्यंत पाचही जणांची हत्या केली. प्रभूने पोलिस जबाबात ही माहिती दिली आहे.

आणखी वाचा - स्त्री की पुरुष कोणाला कोरोनाचा सर्वाधिक धोका

आणखी वाचा - सर्व शाळांमधून सावरकरांचा फोटो हटवणार; सरकारचा निर्णय 

मृतदेह सुरीने कापले
प्रभूने रागाच्याभरात इतके भयानक हत्याकांड केले आहे की, प्रत्येकाच्या अंगावर काटा येतील. प्रभूने घरातील प्रत्येकाच्या डोक्यात जोराने रॉड मारले. त्यानंतर त्यानं सुरीने प्रत्येकाच्या शरिराची तुकडे केले. घरात ते तुकडे त्याने तसेच टाकून दिले होते. पाच दिवसांनंतर शेजारी दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधी असह्य झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कुलूप तोडून दरवाजा उघढला तर, आत भयानक दृष्य पहायला मिळाले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी कुटुंब अतिशय मनमिळावू होते. ज्यूसचा व्यवसाय करून ते चांगली कमाई करत होते. पोलिसांनी संशयावरून प्रभूला ताब्यात घेतले आणि त्याने चौकशीत सगळी माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi bhajanpura murder case family killed by relatives for 30 thousand rupees