

Delhi Blast Update Human Remains Found Near Red Fort at Lajpat Rai Market Forensic Team at Spot
Esakal
सोमवारी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे देश हादरून गेलाय. आता या स्फोटानंतर अनेक खळबळजनक खुलासे होत आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की १० पेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या. तर स्फोटाचा हादरे २०० मीटरपर्यंत जाणवले. दरम्यान, लाल किल्ल्याजवळ स्फोट झाल्यानंतर त्यात मृत्यू झालेल्यांच्या शरिरांचे अवयव ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या न्यू लाजपत नगर मार्केटमध्ये आढळून आलेत. दिल्ली पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.