

Delhi Building Collapse Kills 6 Students
Esakal
Delhi News: दिल्लीत सत्य निकेतन इथं रविवारी दुपारी पाच मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. पीजीसाठी वापरल्या जाणाऱ्या या इमारतीत अनेक विद्यार्थी वास्तव्यास होते. इमारत कोसळून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे.