विवाहबाह्य संबंधातून हत्या; मृतदेह भरलेली सूटकेस रेल्वेतून फेकली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

धक्कादायक बाब म्हणजे त्याचा मृतदेह चक्क सुटकेसमध्ये भरण्यात आला होता. 

दिल्ली : विवाहबाह्य संबंधातून एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. दिल्लीतील एका 46 वर्षीय उद्योजकाचा खून करुन त्याचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून गुजरातमध्ये फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे त्याचा मृतदेह चक्क सुटकेसमध्ये भरण्यात आला होता. 

मृत व्यक्तीचे नाव निरज गुप्ता असे आहे. त्यांचे डोके विटेने ठेचण्यात आले होते. त्यानंतर त्याला भोसकण्यात आले होते तसेच त्याचा गळाही चिरण्यात आला होता. याबाबतची माहिती पोलिस उपायुक्त विजयंता आर्या यांनी दिली आहे. ज्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते तिने दुसर्‍याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गुप्ता यांनी आक्षेप घेतला होता. मृत नीरज गुप्ता हे करोल बागमध्ये एक फायनान्स फर्म चालवायचे. ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत दिल्लीतील आदर्श नगरमध्ये रहायचे. 14 नोव्हेंबर रोजी गुप्ता यांच्या एका मित्राने त्यांच्या गायब होण्याविषयी तक्रार नोंदवली होती. त्यांच्या पत्नीने FIR देखील दाखल केला होता. 

हेही वाचा - हे बरंय! पठ्ठ्याने सात वर्षांपूर्वी दुकानाचं नाव ठेवलं 'कोरोना'; आता होतोय फायदा

गुप्ता यांच्या पत्नीने सांगितले की गेल्या 10 वर्षांपासून ते एका 29 वर्षीय फैझल नावाच्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंधात होते. ही माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी या दिशेने तपास सुरु केला. फैझल या महिलेला त्यांनी अटक केलं तसेच तिचा होणारा पती जुबेर आणि तिच्या आई शाहिन नाझ हिलाही अटक करण्यात आली. जेंव्हा फेझल जुबेरसोबत लग्न करतेय हे समजलं तेंव्हा गुप्ता यांनी तिला असं न करण्याचा सल्ला दिला. तसेच ते तिच्यात घरी 13 नोव्हेंबर रोजी राहिले.

हेही वाचा - Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी

यावेळी त्यांच्यात वाद झाले. संतापलेल्या जुबेरने प्रथम गुप्ता यांचे विटेने डोके फोडले. त्यानंतर त्याने त्यांच्यावर तीन वेळा वार केले आणि चाकूचा वापर करून त्याचा गळा कापला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एका सुटकेसमध्ये या मृतदेहाला भरले. त्यानंतर जुबेरने या सुटकेसला राजधानी एक्स्प्रेसमधून गुजरातला जाताना फेकून दिले. याबाबतची सविस्तर माहिती पोलिस उपायुक्त विजयंता आर्या  यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi Businessman killed his body thrown off train in Gujarat