Accident News: थेट कचोरीच्या दुकानात शिरली भरधाव कार, 6 जणांना उडवलं.. थरारक व्हिडिओ समोर

Accident News: दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील एका प्रसिद्ध कचोरीच्या दुकानात भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार धडकली. त्या ठिकाणी काही लोक कचोरी खात बसले असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली.
Accident News
Accident NewsEsakal

Accident News: दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक भरधाव कार दुकानात घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील एका प्रसिद्ध कचोरीच्या दुकानात भरधाव वेगात असलेली मर्सिडीज कार धडकली. त्या ठिकाणी काही लोक कचोरी खात बसले असताना त्यांना भरधाव कारने धडक दिली. या अपघातात 6 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारचा चालक उत्तर प्रदेशचा असून तो नोएडा सेक्टर-79 येथे राहतो.

मर्सिडीज कार चालकाचे नाव पराग मैनी(वय 36 वर्ष) असे आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या घटनेची माहिती ३१ मार्च रोजी मिळाली होती. या घटनेच्या व्हिडीओमध्ये ही कार अचानक दुकानात कशी घुसते हे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहचंद कचोरी विक्रेत्याच्या दुकानात कार घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Accident News
India Reply to China: चीननं अरुणाचल प्रदेशातील नाव बदलली; भारतानं म्हटलं, चीनचा मुर्खपणा...

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ही कार अचानक येऊन धडकताना दिसते. या घटनेत एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेनंतर एक व्यक्ती त्याच्यासोबत आलेल्या महिलेला शोधत असताना व्हिडिओमध्ये दिसते. मात्र, त्या गाडीने धडक दिल्याने ती महिला दुकानाच्या आतमध्ये पडली पडली होती.

Accident News
Atishi Marlena : ''पक्षात या नाहीतर जेलमध्ये जा'', आपच्या आणखी 'या' चार नेत्यांना होऊ शकते अटक; आतिशी यांचा दावा

कार पोलिसांनी घेतली ताब्यात

अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तीर्थराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात 6 जण जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी कार जप्त केली असून चालक पराग मैनी याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत चालक दारूच्या नशेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Accident News
Accident News: ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जखमी

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी हा अपघात झाला, ज्यामध्ये पाच जण जखमी झाले. आरोपी हा व्यवसायाने वकील असून अपघाताच्या वेळी त्याची पत्नीही कारमध्ये होती. आरोपी मद्यधुंद अवस्थेत नव्हता याला पोलिसांनी दुजोरा दिला असून अपघात ही दुर्दैवी घटना मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com