
PM मोदींच्या मोफत रेवडी विधानावर केजरीवालांचा पलटवार; म्हणाले...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशातील जनतेने रेवडी संस्कृतीबाबत (Rewadi Culture) अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे असे विधान केले होते. मोदींच्या या विधानानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आपल्या देशातील मुलांना मोफत आणि चांगले शिक्षण देणे आणि लोकांना चांगले आणि मोफत उपचार मिळणे याला मोफत रेवडी वाटणे म्हणत नाही. आम्ही विकसित आणि अभिमानास्पद भारताचा पाया रचत आहोत. हे काम 75 वर्षांपूर्वी व्हायला हवे होते असे म्हणत केजरीवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. (Arvind Kejriwal Latest News In Marathi)
हेही वाचा: औरंगाबादच्या नामांतरावरून जलील यांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले आता दररोज...
केजरीवाल फुकट रेवडी वाटताहेत असे म्हणत माझी खिल्ली उडवली जात आहे. मात्र, आपच्या सरकारपूर्वी दिल्लीतील सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट होती. आजही इतर राज्यांमध्ये तशीच परिस्थिती आहे. मात्र, आता दिल्लीतील सरकारी शाळांचे चित्र पालटले असून, आज आपचे सरकार या मुलांना मोफत आणि उत्तम शिक्षण मोफत देत आहे असे करण्यामागे माझं काय चुकलं असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही गरीब जनतेला 200-300 युनिट वीज मोफत देत असल्याने भाजपची मोठी अडचण झाली आहे. 17 हजार लोकांना मोफत योगा शिकवून दिल्ली सरकार काही चुकीचे करत आहे का, असा सवालही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपस्थित केला केला. ते म्हणाले की, आप सरकार महिलांना मोफत प्रवास करवत असून, यात सरकारचे काय चुकले.
हेही वाचा: Video : बुंदेलखंड एक्सप्रेस वे वर 15 हून अधिक उड्डाणपूल अन् बरचं काही
मोफत शिक्षण अन् इतर सुविधा देऊन काय गुन्हा करतोय
केजरीवाल म्हणाले की, जर आम्ही सरकारी शाळांमध्ये 18 लाख मुलांना चांगले शिक्षण देण्याचे काम करत आहोत. इतिहासात पहिल्यांदाच ९९ टक्के निकाल लागला आहे. गेल्या काही वर्षांत जवळपास चार लाख मुले खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये वळली आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालये अप्रतिम बनवण्यात आली आहेत. मोहल्ला क्लिनिकची चर्चा जगभर आहे. याशिवाय वृद्धांना तीर्थक्षेत्री पाठवत आहोत, अशा एक ना अनेक गोष्टी नागरिकांना मोफत दिल्या जात आहे, तर यात काय गुन्हा आहे असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. मोफत रेवड्या तर ते लोक वाठत आङेत जे स्वतःसाठी हजारो कोटींची विमाने विकत घेत आहे.
Web Title: Delhi Cm Arvind Kejriwal Cross On Pm Modi Statement Of Free Rewri Distribute
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..