रामायण-महाभारतासह केजरीवालांनी वाचण्यासाठी मागितलं 'खास' पुस्तक; तुरुंगातून काय सुरु आहे प्लॅन?

Delhi CM Arvind Kejriwal in Custody: तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.
Delhi cm arvind kejriwal
Delhi cm arvind kejriwalEsakal

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत सापडले आहेत. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांचे पाय खोलात जात आहे. आज कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी १५ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आणखी १५ दिवस ते सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असणार आहेत. तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी (Book by Neerja Chowdhury) यांनी लिहिलेले 'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड' (How Prime Ministers Decide) या पुस्तकांची मागणी केली आहे. सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना वाचणार आहेत. या पुस्तकात खास काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.

Delhi cm arvind kejriwal
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच; न्यायालयाने सुनावली १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड' पुस्तकामध्ये देशाचे पंतप्रधान कसे निर्णय घेतात याबाबत सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय देशाचा इतिहास बदलण्यासाठी कसे कारणीभूत ठरले याबाबत या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखिका नीरजा चौधरी या नावाजलेल्या पत्रकार आहेत. देशाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा निर्णयांचे या पुस्तकात विश्लेषण आहे.

पुस्तकामधील महत्त्वाचे विषय

१.आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा मानहाणीकारक पराभव झाला होता. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी सत्तेत येण्यासाठी राबवलेली स्ट्रॅटेजी.

२.शाह बानो प्रकरणात राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा बदललेला निर्णय

३. व्ही.पी सिंग यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळलेले 'मंडल' कार्ड

४. नरसिंह राव यांच्या काळात झालेले बाबरी मशीद प्रकरण

५. अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणीसाठी टाकलेले पाऊल

अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तिहाड तुरुंगामध्ये राहावं लागणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. मद्य धोरण प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपसाठी ही डोकेदुखी वाढवणारी घटना आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com