esakal | दिल्लीला प्राणवायू हवाय! CM केजरीवालांचे उद्योगपतींना पत्र

बोलून बातमी शोधा

दिल्लीला प्राणवायू हवाय! CM केजरीवालांचे उद्योगपतींना पत्र

दिल्लीत रविवारी 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 22 हजार 933 नवीन रुग्ण सापडले आहेत.

दिल्लीला प्राणवायू हवाय! CM केजरीवालांचे उद्योगपतींना पत्र
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी इतर राज्यांना मदतीचं आवाहन केलं होतं. यानंतर आता त्यांनी देशातील मोठ्या उद्योगपतींना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टाटा, बिर्ला, अंबानी, हिंदुजा, महिंद्रा यांच्यासह इतर काही उद्योगपतींना पत्र लिहून ऑक्सिजनसाठी मदत मागितली आहे. केजरीवाल यांनी म्हटलं की, तुमच्याकडे मेडिकल ऑक्सिजन आणि टँकर असतील तर दिल्ली सरकारची मदत करा. तुमच्याकडून जी मदत करता येईल ती मदत नक्की करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

याआधी केजरीवाल यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. त्यात केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, राज्यात ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा असूल तर त्यांनी दिल्लीला मदत करावी. दिल्लीत ऑक्सिजनची निर्मिती होत नाही. सद्या दिल्लीला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही क्रायोजेनिक टँकरसह ऑक्सिजन पुरवलात तर खूप बरं होईल. दिल्लीत कोरोनाचा स्फोट झाला असून रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे.

हेही वाचा: कोलकात्यात कोरोनाचा विस्फोट; दोन पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण

दिल्लीला सध्या मिळत असलेला ऑक्सिजन हा पुरेसा नाही. आम्हाला ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळाली आहे. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही मदत अपुरी पडत आहे. मी हे समजू शकतो की तुमची संघटना एक तर ऑक्सिजनचा वापर करते किंवा त्याची निर्मिती करते, याशिवाय इतरांकडून मदत घेते. जर तुम्ही यावेळी क्रायोजेनिक टँकरसह ऑक्सिजनही पुरवलात तर मी तुमचा ऋणी राहीन. इतर कोणत्याही देशातून क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर आयात करत मदत केल्यास आम्ही ती घेऊ असेही केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा: उमलत्या कळ्यांना मातृत्वाचा शाप! देशात तब्बल ७८ टक्के गर्भपात असुरक्षित

दिल्लीत रविवारी 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 22 हजार 933 नवीन रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेट 30 टक्क्यांच्या वर आहे. तर सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 94 हजारांच्यावर आहे. दिल्ली सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.