

Preparation for nationwide protest in capital as per Rahul Gandhi's instructions.
Sakal
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांचे नेते आणि आंदोलकांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार देशभरातील सर्व काँग्रेस आमदार आणि खासदारांना तातडीने दिल्लीत हजर राहण्याचे कडक आदेश जारी करण्यात आले आहेत. दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एक महाप्रचंड देशव्यापी आंदोलन छेडण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचे संकेत मिळत असून, या आदेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.