Money Laundering Case: के कविता यांना दिलासा नाहीच! 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढली

K Kavitha to judicial custody: दिल्ली कोर्टाने सोमवारी बीआरएसच्या नेत्या के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
 K Kavitha
K Kavitha

नवी दिल्ली- दिल्ली कोर्टाने सोमवारी बीआरएसच्या नेत्या के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याआधी सीबीआयने १५ एप्रिलपर्यंत के कविता यांना कोठडीत ठेवले होते. आजच्या सुनावणीदरम्यान दिल्ली कोर्टाने के कविता यांना दिलासा देण्यास नकार दिला. (Delhi Court on Monday sent BRS leader K Kavitha to judicial custody till April 23 in a money laundering case)

के कविता यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देत भारतीय जनता पक्षावर टीका केली. ही सीबीआयची कस्टडी नाही, तर भाजपची कस्टडी आहे. भाजप जे काही बाहेर बोलते तेच सीबीआय मला आतमध्ये विचारत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तेच तेच प्रश्न विचारले जात आहेत. नवीन काही नाही, असं त्या म्हणाल्या.

 K Kavitha
Delhi Liquor Case : बीआरएस नेत्या के. कविता यांना सीबीआयकडून अटक

के कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. सक्तवसुली संचालयाने के कविता यांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. सीबीआयनुसार, के कविता या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणात कट रचणाऱ्यांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळून आले आहेत.

 K Kavitha
खासदारकीला पराभूत उमेदवारास आमदारकीची लढाई खूप कठीण! राजकीय समीकरणे बदलली; आमदारकीसाठी इच्छुकांकडून शब्द घेऊनच लोकसभा निवडणुकीत मदत

कविता यांची याप्रकरणी आधी चौकशी करण्यात आली होती. नंतर झालेल्या चौकशीमध्ये मद्य घोटाळ्याप्रकरणी के कविता यांची प्रमुख भूमिका असल्याचं समोर आलं. चौकशीदरम्यान के कविता यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. शिवाय योग्यप्रकारे सहकार्य केले नाही. सत्य बाहेर येण्यासाठी त्यांनी सहकार्य करायला हवे असं सीबीआयने कोर्टामध्ये सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com