
Delhi Fire: दिल्लीतील द्वारका सेक्टरमध्ये मंगळवारी एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग भडकली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली होती. यामुळे इमारतीसह आजूबाजूच्या परिसरात गोंधळ उडाला होता. या आगीच्या घटनेनंतर घाबरून इमारतीच्या छतावरून बापाने दोन चिमुकल्या मुलांसह उडी मारली. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.