
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आज (५ फेब्रुवारी) संपले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विविध सर्वेक्षण संस्थांनी संध्याकाळी ६.३० नंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसताना दिसत आहे. २५ वर्षांनंतर भाजप दिल्लीत पुन्हा सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे.