कोरोनाच्या TOP 10 राज्यातून 'हे' राज्य झाले गायब

Coronavirus
Coronavirus
Updated on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी होती. मात्र, आता या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. राजधानी दिल्लीत नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याने ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडाही कमी झाला आहे. यापूर्वी दिल्ली राज्य कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत TOP 10 मध्ये होते. पण आता दिल्ली 11 व्या स्थानावर गेली आहे. 

राजधानी दिल्लीत यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी होती. परंतु आता या राज्यात रुग्णांचा आकडा कमी होत आहे. सध्या दिल्लीत 7.99 टक्के ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्यापैकी 89.07 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर 2.93 टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत दररोज एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. 

10 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या

दिल्लीत कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. त्यानुसार दिल्लीत 10 लाखांहून अधिक नमुन्यांची तपासणी केली. या आकडेवारीनुसार, जवळपास निम्म्याहून अधिक नमुन्यांची तपासणी मागील 30 दिवसांत करण्यात आली.

आरोग्य विभागाने गुरुवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, राजधानीत आत्तापर्यंत 10,13,694 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. मागील महिन्यात कोरोना व्हायरसचे दररोज 2 ते 3 हजार प्रकरणे समोर आली आहेत. हे पाहता दिल्लीची तपासणी क्षमता जास्त झाली आहे. जुलै महिन्यात 3.82 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. 

चार समित्या स्थापन करण्याचे आदेश

केजरीवाल सरकार आता कोविड 19 रुग्णालयात झालेल्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी दिल्ली सरकारकडून चार समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com