

Delhi Blaze Claims 21 Lives, Dozens Injured
Esakal
दिल्लीतील मालवीय नगर इथं बुधवारी एका रेस्टॉरंटला भीषण आग लागली. या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये काही परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मालवीय नगरमधल्या या इमारतीत एका रेस्टॉरंटशिवाय राहण्यासाठी व्यवस्था असलेलं हॉटेलही होतं. इमारतीत थांबलेल्या लोकांमध्ये बहुतांश असे होते ज्यांच्या नातेवाईकांवर जवळच्याच मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते.