G-20 Summit in India: २४ तास सक्रीय पण कोणालाही दिसत नाहीत; जी २० ची सर्वात सतर्क सुरक्षा व्यवस्था HIT बद्दल जाणून घ्या...

एचआयटी स्क्वा़डजवळ अमेरिकन ब्लॉक १७ पिस्तुल, कॉर्नर शॉट्स पिस्तुल, इस्राइलची टॅवर टार २१ एसॉल्ट रायफल याशिवाय अत्याधुनिक हत्यारही उपस्थित होते.
Security Service G-20
Security Service G-20Sakal

दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी २० शिखर परिषदेचा काल समारोप झाला. उच्चस्तरीय परदेशी पाहुण्यांसाठी दिल्लीतल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली होती. जगभरातून महत्त्वाचे लोक दिल्लीमध्ये आल्याने सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली होती.

या सुरक्षा व्यवस्थेमध्ये HIT स्क्वाडचाही समावेश होता. HIT म्हणजे हाऊ इंटरवेन्शन टीम. एचआयटी टीमने दिल्लीतल्या जी २० शिखर परिषदेची सुरुवात होण्याच्या आधी दिल्लीमधल्या पाहुणे थांबलेले असलेल्या हॉटेल्सच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

Security Service G-20
G20 summit: G-20 परिषदेत दिल्ली जाहीरनामा मंजूर; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला यश

एचआयटी टीमचे जवान प्रत्येक हॉटेलच्या आत काही विशेष खोल्यांमध्ये उपस्थित होते. पण ते कोणत्या खोलीमध्ये आहेत हे त्यांच्या कमांडरशिवाय आणखी कोणालाही माहित नव्हतं. या जवानांना स्पष्ट आदेश होते की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे जवान फक्त आणि फक्त आपल्या कमांडरचा आदेश मानतील. काही हल्ला झाला किंवा काही हालचाल करायची असेल, तर ते फक्त आणि फक्त आपल्या कमांडरची परवानगी मागतील.

गोपनीयता एवढी होती की जी २० च्या सुरक्षेसाठी असलेल्या इतर सुरक्षा व्यवस्थांनाही याबद्दल माहिती नव्हती. एचआयटीचे जवान प्रत्येक हॉटेलच्या मध्यभागी अशा काही खोल्यांमध्ये उपस्थित होते, जिथून ते प्रत्येक परिस्थितीवर, हालचालीवर नजर ठेवू शकतील. एचआयटी स्क्वा़डजवळ अमेरिकन ब्लॉक १७ पिस्तुल, कॉर्नर शॉट्स पिस्तुल, इस्राइलची टॅवर टार २१ एसॉल्ट रायफल याशिवाय अत्याधुनिक हत्यारही उपस्थित होते. खोल्यामध्ये अंधारातही हे जवान आपलं लक्ष्य सहज भेदू शकतात.

Security Service G-20
G-20 Summit in Delhi: शिखर परिषदेत भारताची भूमिका काय? परदेशी पाहुण्यांच्या बैठकीने देशाला काय फायदा होणार?

HIT ची स्थापना कधी आणि का झाली?

या एच आयटी टीमला पहिल्यांचा जी २० परिषदेदरम्यान तैनात करण्यात आलं आहे. जाणून घ्या या टीमचा इतिहास?

२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशामध्ये पहिला असा हल्ला झाला ज्यामध्ये दहशतवादी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात घुसले आणि त्यांनी पाहुण्यांवर बेछुट गोळीबार केला. अशा पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आपल्याकडे कोणताही अनुभव नव्हता आणि प्रशिक्षणही नव्हतं. या मुंबईतल्या हल्ल्यामध्ये १६६ जणांनी प्राण गमावले.

या हल्ल्यानंतर भविष्यात अशा प्रकारच्या हल्ल्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर विचार सुरू झाला. जर समजा कोणत्या हॉटेलच्या बंद खोलीमध्ये दहशतवादी घुसले आणि तिथल्या लोकांना त्यांनी बंदी बनवलं तर ती परिस्थिती हाताळायची कशी? विविध राज्यांचे पोलीस, NSG कमांडो, मरीन कमांडो, रॅपिड अॅक्शन फोर्स तसंच इतर सुरक्षा यंत्रणांकडे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी कोणतीच योजना नव्हती.

Security Service G-20
G-20 Summit in Delhi: कोण आहेत भारताचे शेरपा? कोणाकडे असते ही जबाबदारी आणि यांचं काम काय असतं?

यावर विचारविमर्श करत असतानाच बरेच कष्ट घेऊन, प्रयत्न करून आणि प्रशिक्षणाने HIT स्क्वाडचा जन्म झाला. HIT म्हणजे हाऊस इंटरवेन्शन टीम. हे जवान विशेषतः जवळच्या हल्ल्यासाठी किंवा लढायांसाठी सज्ज आहेत. म्हणजे कोणत्याही हॉटेलच्या बंद खोलीमध्ये दहशतवादी घुसले आणि त्यांनी जर कोणत्या अति महत्त्वाच्या पाहुण्याला वेठीस धरलं, ते हे जवान अशा परिस्थितीचा सामना करून त्यातून मार्ग काढू शकतात. यांना यासाठी विशेष प्रशिक्षणही दिलं जातं.

या जवानांकडे अत्याधुनिक आणि खतरनाक हत्यारंही असतात. जी २० शिखर परिषदेच्या जवळपास ६ महिने आधी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. अनेक डमी ट्रायल्सही करण्यात आले. हे ट्रायल्स त्याच हॉटेल्समध्ये झाले जिथे विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष या शिखर परिषदेसाठी थांबले होते.

HIT शिवाय जी २० च्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी श्वास पथकही तैनात करण्यात आलं होतं. दिल्ली विमानतळापासून ते पाहुण्यांच्या हॉटेलपर्यंत या श्वान पथकाची सुरक्षा होती. या पथकाचं नाव होतं K-9. या पथकात ६९ कुत्रे आहेत. .यांना कानाकोपऱ्यात तैनात कऱण्यात आलं होतं. यामध्ये बेल्जियन मेलिनोईल, गोल्डन रिट्रिवर, लॅब्राडोर, अल्सेशियन अशा विविध प्रजातींची कुत्री आहेत. या कुत्र्यांनाही ६ महिन्यांहून अधिक काळ प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com