

Firefighters responding to a residential fire in Delhi’s Hauz Khas area after an alleged AC explosion caused a fatal incident involving a retired IAS officer.
esakal
देशाची राजधानी दिल्लीत एक भीषण घटना घडली आहे. एका निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात आग लागल्याने, ८० वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेत अधिकाऱ्याचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली घटनेच्या वेळी, अधिकाऱ्याचे कुटुंब आणि कर्मचारी यांच्यासह एकूण पाच व्यक्ती घरात उपस्थित होत्या. अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी २०-२५ मिनिटे लागल्याने,वेळेत मदत न पोहोचल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला आहे.