esakal | केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीविरोधातील ट्विट डिलिट करा; हायकोर्टाचे साकेत गोखलेंना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीविरोधातील ट्विट डिलिट करा; हायकोर्टाचे साकेत गोखलेंना आदेश

दिल्ली उच्च न्यायालयात साकेत गोखलेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीविरोधातील ट्विट डिलिट करा; हायकोर्टाचे साकेत गोखलेंना आदेश

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या पत्नीबाबत केलेलं ट्विट डिलिट करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने साकेत गोखले यांना दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात साकेत गोखलेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटलं की, लक्ष्मी पुरी यांच्याविरोधात केलेलं ट्विट 24 तासाच्या आत डिलिट करा. जर ते ट्विट डिलिट केलं नाही तर ट्विटरने ते हटवावं. तसंच गोखले यांनी लक्ष्मी यांच्याविरोधात कोणतंही ट्विट करू नये असंही न्यायालयाने बजावलं आहे.

साकेत गोखले यांच्या विरोधात अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांना अवमान याचिका दाखल केली आहे. यामध्ये साकेत गोखले यांनी ट्विट डिलिट करण्याची आणि 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज : PM मोदी

साकेत गोखले यांनी ट्विट केलं होतं की, पुरी यांनी स्वित्झर्लंडमध्ये संपत्ती खरेदी केली आहे. तसंच या ट्विटमध्ये लक्ष्मी पुरी यांचे पती केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचाही उल्लेख केला होता. यानंतर लक्ष्मी पुरी यांनी साकेत गोखलेंना कायदेशीर नोटीस पाठवून ट्विट हटवण्यास सांगितले होते. मात्र साकेत गोखले यांनी ट्विट हटवण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाने लक्ष्मी पुरी यांना सांगितलं की, या प्रकरणी ट्विटरलासुद्धा पक्षकार करावं.

गेल्या महिन्यात साकेत गोखले यांनी 13 जून आणि 26 जूनला दोन ट्विट केले होते. यामध्ये पुरी यांनी स्वित्झर्लंडमध्ये मालमत्ता खरेदी केल्याबाबत लिहिण्यात आलं होतं. तसंच यात हरदीप सिंह पुरी यांचेही नाव होते. न्यायालयाने या प्रकरणी लक्ष्मी पुरी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणी लक्ष्मी पुरी यांनी साकेत गोखले यांच्याकडे 5 कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसंच न्यायालायने हे ट्विट हटवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती. गोखले यांनी केलेली ट्विट खोटे आणि तथ्यहिन असल्याचा आरोप लक्ष्मी पुरी यांनी केला होता. यामुळे कुटुंबाची मानहानी झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

loading image