esakal | "दिल्लीला तात्काळ ऑक्सिजन पुरवा अन्यथा कारवाईला सामोर जा"; हायकोर्टाचा केंद्राला इशारा

बोलून बातमी शोधा

narendra modi
"दिल्लीला तात्काळ ऑक्सिजन पुरवा अन्यथा कारवाईला सामोर जा"; हायकोर्टाचा केंद्राला इशारा
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : ऑक्सिजनअभावी दिल्लीतील परिस्थिती नाजूक बनली आहे. मात्र, वारंवार मागणी करुनही केंद्राकडून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यानं दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला शनिवारी चांगलंच फटकारलं. दिल्लीला आजच्या आज ऑक्सिजन पुरवा अन्यथा कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल कारवाईला तयार राहा असा कडक इशाराच कोर्टानं केंद्राला दिला. केंद्रावर ताशेरे ओढताना ऑक्सिजन हा इगोचा विषय बनलाय का? अशी टिपण्णीही हायकोर्टानं केली आहे.

हेही वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आयातीला परवानगी

हायकोर्टानं केंद्राला आदेश देताना म्हटलं की, "दिल्लीला कुठल्याही परिस्थितीत शनिवारी ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल याची खात्री करा. जर हे झालं नाही तर आदेश न पाळल्यानं तो कोर्टाचा अपमान असेल असे मानू" सुनावणीदरम्यान, दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा कोर्टाला म्हणाले, "मी सध्या आमचं काम थांबवण्याचा विचारात आहोत. आमची कार्यालयं आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आम्हाला ऑक्सिजनची गरज आहे, आम्ही करावं तरी काय?. आम्ही केंद्राकडे वारंवार मागणी करुन थकलो आहोत. आम्हाला आता काय बोलायचंय हेच कळत नाही. आम्ही गेल्या दहा दिवसांपासून पाहतोय केंद्रानं हा इगोचा मुद्दा बनवला आहे, हे असं होऊ शकत नाही"

हेही वाचा: विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना दिलासा नाहीच!

दरम्यान, दिल्ली हायकोर्टानं दिल्ली सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर केंद्राला म्हटलं, "आता पाणी आमच्या डोक्यावरुन जायला लागलं आहे. आता सर्व पुरे झालं. तुम्हाला दिल्लीसाठी ऑक्सिजन तयार ठेवावा लागेल, तुम्हाला याची पूर्तता करावीच लागेल" दिल्ली सरकारला सांगताना हायकोर्टानं म्हटलं, "केंद्र सरकार सोमवारी काय म्हणतंय ते पाहुयात. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा लिंडे एअरकडून केलं जातो. मात्र, पुरवठादाराकडूनही काहीही प्रतिसाद आलेला नाही. रुग्णालयांना ऑक्सिजनची तीव्र गरज आहे."

हेही वाचा: रशियाची 'स्पुटनिक-व्ही' लस अखेर भारतात दाखल; पाहा व्हिडिओ

केंद्राला सवाल करताना दिल्ली सरकारनं म्हटलं, "जर तुम्ही आम्हाला ऑक्सिजन पुरवू शकत नसाल तर आम्हाला तसं सांगा आम्ही ते मान्य करु." यावर केंद्रानं प्रतिक्रिया देताना म्हटलं, "दिल्ली सरकारनं अशा प्रकारची भाषा वापरु नये." दरम्यान, दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात ८ रुग्णांचा शनिवारी ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. त्याचबरोबर साकेत येथील पीएसआरआय रुग्णालयानेही आपल्याकडे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे.