Arvind Kejriwal : केजरीवालांना दिलासा नाहीच! दिल्ली हायकोर्टाने जामीन देण्याची विनंती करणाऱ्या याचिकाकर्त्यांला ठोठावला दंड

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
delhi high court rejects plea seeking bail for AAP leader Arvind Kejriwal till marathi news rak94
delhi high court rejects plea seeking bail for AAP leader Arvind Kejriwal till marathi news rak94

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सर्व खटल्यांप्रकरणी केजरीवाल यांना असाधारण जामीन दिला जावा, अशी जनहित याचिका न्यायालयात दाखल झाली होती. प्रलंबित सर्व प्रकरणांमध्ये असाधारण जामीन देता येत नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया आणि उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमद यांच्या हत्येचा संदर्भ देत केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. बलात्कार, हत्या, दरोडे, बॉम्ब स्फोट यासारख्या गंभीर गुन्ह्यांतील कैद्यांसोबत केजरीवाल यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. यामुळे त्यांना धोका उद्भवू शकतो. जोवर केजरीवाल मुख्यमंत्री पदावर आहेत, तोवर त्यांना असाधारण जामीन दिला जावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

delhi high court rejects plea seeking bail for AAP leader Arvind Kejriwal till marathi news rak94
Supreme Court On Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा दणका! चार आठवड्यात सरेंडर करण्याचे दिले निर्देश

केजरीवाल हे न्यायालयीन आदेशानुसार कोठडीत आहेत, असा शेरा उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान मारला. वुई दि पिपल या नावाखाली कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने केजरीवाल यांच्या जामिनासाठी जनहित याचिका दाखल केली होती. केजरीवाल हे साक्षीदारांना प्रभावित करणार नाहीत तसेच त्यांच्या वतीने आपण बॉन्ड देतो, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे चकित करणारे आहे, असा शेरा न्यायालयाने सुनावणी दरम्यान मारला. 

delhi high court rejects plea seeking bail for AAP leader Arvind Kejriwal till marathi news rak94
Prasad Vedpathak: "अचानक त्यांनी मला 'बायकोजीवी' म्हणायला सुरुवात केली..."; ट्रोलर्सला युट्यूबर प्रसादचं रोखठोक उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com