
महिला दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली. दिल्ली निवडणुकीत संकल्प पत्रात महिला समृद्धी योजनेची घोषणा भाजपने केली होती. यात गरीब महिलांना अडीच हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. आता यावर शिक्कामोर्तब झालंय. दिल्ली सरकारने अर्थसंकल्पात यासाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे दिल्लीतील गरीब बहिणींना समृद्धी योजनेचा लाभ देता येणार असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. या कार्यक्रमावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेसुद्धा उपस्थित होते.