Delhi Explosion Eyewitness Account
esakal
दिल्लीत आज सायंकाळी ७ वाजतादरम्यान दोन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक डझनपेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता की मृत व्यक्तींच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. महत्त्वाचे म्हणजे या स्फोटातील मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता काही प्रत्यक्षदर्शींनी समोर येत या स्फोटाबाबत माहिती दिली आहे.