

Rajasthan Expressway Crash Kills 8 Devotees, 15 Injured
Esakal
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर शनिवारी पहाटे भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झालाय. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात हा अपघात झाला. मध्य प्रदेशहून जयपूरच्या दिशेनं जाणारी टेम्पो ट्रॅव्हलर बस अचानक पुलावरून २० फूट खाली कोसळली. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.