

Three Dead After Pickup Catches Fire on Delhi Mumbai Expressway
Esakal
राजस्थानच्या अलवरमध्ये दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. पिकअप आणि कारच्या धडकेनंतर लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जयपूरला हलवण्यात आलंय. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाहीय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.