

Delhi-Mumbai Expressway Accident
ESakal
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताचा तपास सुरू केला, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.