Delhi : विनय कुमार सक्सेनांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती I Vinai Kumar Saxena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinai Kumar Saxena

अनिल बैजल यांनी लेफ्टनंट गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन एलजीचं नाव समोर आलंय.

Delhi : विनय कुमार सक्सेनांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती

New Lieutenant Governor of Delhi : अनिल बैजल (Anil Baijal) यांनी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन एलजीचं नाव समोर आलंय. विनय कुमार सक्सेना (Vinai Kumar Saxena) यांना दिल्लीचे नवे उपराज्यपाल बनवण्यात आलंय. सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केलीय.

18 मे रोजी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी अचानक राजीनामा दिला होता. बैजल यांनी राजीनाम्यामागं वैयक्तिक कारणं दिली होती. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाला. मात्र, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरचा कार्यकाळ निश्चित नाहीय. दिल्लीचे केजरीवाल सरकार (Kejriwal Government) आणि माजी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांच्यातील संघर्षाच्या चर्चा अनेक मुद्द्यांवरून चव्हाट्यावर येत होत्या.

हेही वाचा: भाजपनं संभाजीराजेंचा सन्मान केला, आता शिवसेनेनंही करावा : चंद्रकांत पाटील

वास्तविक, दिल्ली सरकारच्या 1000 बसेसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी बैजल यांनी वर्षभरापूर्वी तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी भारतीय जनता पक्ष सातत्यानं करत होती. उपराज्यपालांनी स्थापन केलेल्या पॅनेलमध्ये एक निवृत्त आयएएस अधिकारी, दक्षता विभागाचे प्रधान सचिव आणि दिल्ली सरकारचे परिवहन आयुक्त यांचा समावेश होता. या मुद्द्यावरून केजरीवाल सरकारशीही त्यांची चांगलीच खडाजंगी झाली होती.

Web Title: Delhi New Lg Vinay Kumar Saxena Appointed As The New Lieutenant Governor Of Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiRam Nath Kovind
go to top