पेट्रोल 34 रुपये तर, डिझेल 38.67 रुपये

पीटीआय
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कर व वितरकांचे कमिशन वगळून पेट्रोलचा दर प्रतिलिटर 34.04 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 38.67 रुपये आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

लोकसभेत लेखी उत्तरात अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की दिल्लीत कर व वितरकांचे कमिशन पेट्रोलवर 96.9 टक्के आणि डिझेवर 60.3 टक्के आहे. दिल्लीत 19 डिसेंबरला पेट्रोलचा दर प्रतिलिटर 70.63 रुपये होता. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क 17.98 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 15.02 रुपये आणि वितरकाचे कमिशन 3.59 रुपये आहे. 

दिल्लीत डिझेलचा दर 19 डिसेंबरला प्रतिलिटर 64.54 रुपये होता. यात केंद्रीय उत्पादन शुल्क 13.83 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 9.51 रुपये आणि वितरकाचे कमिशन 2.53 रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेलचा दर दररोज बाजारभावानुसार बदलत असून, प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक करांच्या प्रमाणानुसार वेगवेगळे दर आहेत, असे शुक्‍ला यांनी उत्तरात नमूद केले आहे. 

केंद्रीय उत्पादन शुल्क 

आर्थिक वर्ष 2017-18 
पेट्रोल ः 73,516 कोटी रुपये 
डिझेल ः 1.5 लाख कोटी रुपये 

आर्थिक वर्ष 2018-19 

(पहिली सहामाही) 
पेट्रोल ः 25,318 कोटी रुपये 
डिझेल ः 46,548 कोटी रुपये 

Web Title: In Delhi petrol is priced at Rs 34 while diesel costs Rs 38