शेतकरी शब्द पाळणार नाहीत याचा अंदाज आलेला; नेत्यांनी विश्वासघात केल्याचा पोलिसांचा आरोप

पीटीआय
Thursday, 28 January 2021

ट्रॅक्टर मोर्चा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच या दरम्यान निघणे अपेक्षित असताना तो बराच आधी सुरू करण्यात आला. तसेच, केवळ पाच हजार ट्रॅक्टरना परवानगी देण्यात आली होती.

नवी दिल्ली - शेतकरी संघटनांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी आज, ‘कोणाही दोषीला सोडणार नाही’ असा इशारा दिला. प्रजासत्ताकदिनी झालेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागल्याबद्दल त्यांनी शेतकरी नेत्यांवर आरोप केले. 

दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, ट्रॅक्टर मोर्चाबाबत शेतकरी संघटनांबरोबर सविस्तर आधी चर्चा झाली होती. या चर्चेवेळी काही अटी ठरल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांनी मान्य केल्यानंतरच मोर्चाला परवानगी देण्यात आली होती. ट्रॅक्टर मोर्चा दुपारी बारा ते संध्याकाळी पाच या दरम्यान निघणे अपेक्षित असताना तो बराच आधी सुरू करण्यात आला. तसेच, केवळ पाच हजार ट्रॅक्टरना परवानगी देण्यात आली होती, प्रत्यक्षात त्याहून कितीतरी अधिक पटींनी ट्रॅक्टर सहभागी झाले होते. शस्त्र आणण्याची परवानगी नसतानाही ती आणली गेली, असा दावा श्रीवास्तव यांनी केला. या अटींचा भंग करून शेतकरी नेत्यांनी विश्‍वासघात केल्याचे आयुक्तांनी सांगितले. मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यांना रोखताना ३९४ पोलिस जखमी झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविताना संयम दाखविल्याने एकाचाही बळी गेला नाही. याप्रकरणी २५ एफआयआरची नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोंधळ घालणाऱ्यांना पकडण्यासाठी चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून सीसीटीव्ही आणि व्हिडिओंचाही वापर केला जात असल्याचे आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले. 

Viral Video: 'तुम्ही मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने कोरोना लस...

शब्द पाळणार नाहीत याचा अंदाज आला...
सतनामसिंग पन्नू आणि दर्शनपाल यांच्यासारख्या शेतकरी नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे केल्यानेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप आयुक्त श्रीवास्तव यांनी केला. शेतकरी नेते दिलेला शब्द पाळणार नाहीत, याचा अंदाज आला होता. त्यांनी आक्रमक आणि बंडखोर घटकांना पुढे आणत चिथावणीखोर भाषणे दिली, असे ते म्हणाले.

हे वाचा - फेब्रुवारीमध्ये होणार 5 मोठे बदल; वाचा सर्वसामान्यांवर काय होईल परिणाम?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Police Commissioner S. N. Srivastava farmers protest police