

Students' anger against Delhi police action; Sensation due to video filmed from inside the bus.
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलक नेत्या नेहा बोरा यांनी थेट पोलीस बसच्या आतून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "या दिल्ली पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या (Torture Camps)?" असा संतप्त सवाल करत त्यांनी पोलिसांच्या वागणुकीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.