शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत गोंधळ घडवण्यासाठी पाकमधून 300 ट्विटर अकाऊंट सक्रिय

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 January 2021

दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीत 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या मुद्द्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. रॅली कोणत्या मार्गाने जाईल हेही निश्चित झालं आहे. दिल्ली पोलिसांनी म्हटलंय की ट्रॅक्टर रॅलीला पूर्ण सुरक्षा दिली जाईल, कारण पाकिस्तानचे दहशतवादी काही गडबड करण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी दावा केला की, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची प्रस्तावित ट्रॅक्टर परेड बाधित करण्यासाठी पाकिस्तानमधून 300 पेक्षा अधिक ट्विटर अकाऊंट बनवण्यात आले आहेत. 

Plane Crash: 4 खेळाडूंसह ब्राझिलियन फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांचा मृत्यू

ट्रॅक्टर परेड संबंधित विस्तृत्व योजनेसंबंधी बोलताना विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक म्हणाले की, मंगळवारी प्रजासत्ताक दिनादिवशीचा कार्यक्रम संपल्यानंतर कडक सुरक्षेमध्ये ट्रॅक्टर परेड काढली जाईल. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडला बाधित करण्यासाठी पाकिस्तानमधून 13 ते 18 जानेवारीदरम्यान 300 पेक्षा अधिक ट्विटर अकाऊंट बनवण्यात आले आहेत. यासंबंधी विविध एजेंसीकडून एक प्रकारचीच माहिती मिळत आहे. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येईल. 

रविवारी पोलिस कमीशनरांनी आदेश दिलाय की, प्रजासत्ताक दिनादिवशी सुरक्षेसाठी तैनात सर्व पोलिस कर्मचारी परेडनंतर लगेच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या ड्यूटीसाठी शॉर्ट नोटीसवर तयार रहा. ट्रॅक्टर रॅलीमध्ये पाकिस्तानी दहशतवादी गडबड करण्याची दाट शक्यता आहे. त्यात 308 ट्विटर अकाऊंट्स संदिग्ध आढळले आहेत. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी शांततापूर्ण पद्धतीने ट्रॅक्टर रॅली काढावी, लेनमध्ये चालावं, स्टंट करु नये. 

Farmers March : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईत 'मार्च',...

दरम्यान, कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 61 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. तर एकीकडे शेतकरी येत्या प्रजासत्ताक दिनाला 'किसान गणतंत्र परेड' अशी ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्या पुढे रेटायचा प्रयत्न करण्यासाठी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत आहेत. या ट्रॅक्टर परेडला परवानगी नाकारण्यासाठी केंद्र सरकार हरतर्हेचे प्रयत्न करत होते. सरकार परवानगी देवो अगर न देवो, आम्ही ही परेड काढूच, असा शेतकऱ्यांचा निर्धार होता. मात्र, सरतेशेवटी दिल्ली पोलिसांना या परेडसाठी परवानगी द्यावी लागली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Police Republic Day Twitter handles pakistan terrorist