

Home Minister Amit Shah arriving at Delhi’s Red Fort after the explosion to assess the situation and meet security officials.
esakal
Delhi Red Fort Blast: Major Security Alert in the Capital : दिल्लीतील लाल किल्ला येथे झालेल्या स्फोटानंतर देशभर खळबळ माजली आहे. आतापर्यंत हाती आलेल्य माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, ३० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली आणि पंतप्रधान मोदींशी फोनवर संपर्क साधला.
यानंतर अमित शहा यांनी या घटनेबाबत स्वत: माहिती दिली. अमित शहा यांनी सांगितले की, थोड्याचवेळात मी स्वत: घटनास्थळी जाणार आहे आणि त्यानंतर रूग्णालयात जाऊन जखमींना भेटणार आहे. याशिवाय, यावेळी अमित शहा यांनी या स्फोटात काहीजणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिला आहे.
ह्यूंदई i20 कारमध्ये एका स्फोट झाला. या स्फोटामुळे ती कार आणि त्या कारच्या आसपास असणाऱ्या काही वाहनांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे काही लोक जखमी झाले आहेत आणि काहीजणांचा मृत्यूही झालेला आहे.
रूग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. काहीजण जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आम्ही सर्व अँगल खुले ठेवत याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.
स्फोटाबाबत जशी माहिती मिळाली, दिल्ली पोलिस, गुन्हे शाखा, एनआयए टीम, एनएसजी आदी टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि सर्वप्रकारची चौकशी सुरू आहे. काही वेळातच स्फोटाचे नेमके कारण काय आहे? याबाबत आपल्या तपास यंत्रणांकडून माहिती समोर येईल अशी मी आशा करतो.
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मला पंतप्रधान मोदींचा फोन आला होता. प्राथमिक माहिती घेऊन मी पंतप्रधानांना त्याबाबत सांगितले आहे. आता मी घटनास्थळाकडे निघत आहे. उद्या पहाटे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्रालयात बैठक घेऊन याबाबत सखोल माहिती घेतली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.