

Delhi Blast UP Father of Three Ashok Kumar Dies Family Devastated
Esakal
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानं देश हादरला आहे. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून त्यात उत्तर प्रदेशातल्या अशोक कुमार यांचा समावेश आहे. ३४ वर्षीय अशोक कुमार हे अमरोहा जिल्ह्यात राहत होते. दिल्लीत ते बस कंडक्टर म्हणून काम करायचे. ड्युटीनंतर ते घरी परतत असताना स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. अशोक कुमार यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.