Coronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 मार्च 2020

कोरोनाविरुद्ध लढण्यास सरकार तयार

- प्रयोगशाळेची स्थापना

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या भारतात कोरोनाचे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर 2 रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 जण हे इटलीचे नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. यातील काहीजण भारतात फिरायला आले आहेत. 

अर्थसंकल्प २०२० : 'महा'अर्थसंकल्पात सादर, विदर्भाला मिळाले हे... 

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 31 झाली असून, यामध्ये यातील तीन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत.

Coronavirus : इराणमधील भारतीय म्हणतात, 'आम्हाला वाचवा ओ'

कोरोनाविरुद्ध लढण्यास सरकार तयार

देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. 

प्रयोगशाळेची स्थापना

कोरोना विषाणूचा संशय असलेल्या लोकांच्या चौकशीसाठी सरकारने यापूर्वीच 15 प्रयोगशाळेची स्थापना केली आहे आणि आता 19 आणखी प्रयोगशाळेची तयारी सुरू केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi resident tests positive total cases in India rise to 31