Air Pollution : दिल्लीतील शाळांना दोन दिवस सुट्टी!

वृत्तसंस्था
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्यावर होत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळांना 14 आणि 15 नोव्हेंबर या दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना पर्यावरण प्रदूषण नियंत्रण व संरक्षण प्राधिकरणाचे (ईपीसीए) अध्यक्ष डॉ. भूरेलाल यांनी दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांना केल्या आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहचली आहे. त्यामुळे डॉ. भूरेलाल यांनी शाळांना सुट्टी देण्याबाबत मुख्य सचिवांना पत्र लिहून सूचना केल्या आहेत. भूरेलाल यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून शाळांना दोन दिवस सुट्टी राहणार असल्याची माहिती दिली.

सिसोदिया यांनी ट्विटमध्ये सांगितले, की उत्तर भारतात पराली प्रदूषणामुळे बिघडत चाललेली स्थिती पाहून दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्वच शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

हॉट-मिक्स प्लांट्सवरही बंदी

दिल्ली-एनसीआरमध्ये हॉट-मिक्स प्लांट्स आणि स्टोन क्रशरवरही 15 नोव्हेंबरपर्यंत बंदी आणली आहे. तसेच पीएनजी फ्यूलचा वापर ज्या कंपन्या करत नाहीत, अशा सर्व कंपन्या 15 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi schools to be closed Thursday Friday as air quality sharply falls