Shraddha Murder Case : हत्येवेळी श्रद्धा होती गरोदर? आफताबच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर, संशय वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

विकृत प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते.

Shraddha Murder Case : हत्येवेळी श्रद्धा होती गरोदर? आफताबच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर

Shraddha Murder Case : दिल्लीत झालेल्या तरुणीच्या हत्याकांडानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात फेकले. लग्नाचा तगादा लावत असल्यानं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या प्रियकरानंच तिची हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडालीय. हत्या झालेली श्रद्धा वालकर (Shraddha Walker) ही मूळची मुंबई जवळच्या वसईतील राहणारी आहे.

मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

दिल्लीत 14 नोव्हेंबरला मन सुन्न करणारी घटना समोर आली. विकृत प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. गेल्या सहा महिन्यापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, अखेर पोलिसांनी या विकृती प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येसंबंधीचे अनेक भयंकर खुलासे दिवसेंदिवस उघड होताना दिसत आहेत. दिल्लीच्या महरौली पोलिसांना अद्याप या हत्येचा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही, ज्यावरून श्रद्धाची हत्या झाल्याची पुष्टी होऊ शकेल.

हेही वाचा: बाबासाहेबांचा 'तो' पुतळा उभा राहिला, तर त्याला विरोध करु; आनंदराज आंबेडकरांचा थेट इशारा

श्रद्धा हत्येवेळी गर्भवती होती?

पोलीस तिच्या मृतदेहाचे अवशेष गोळा करण्यासाठी आफताबनं सांगितलेल्या ठिकाणांवर तपास करत आहे. दरम्यान, मृत्युवेळी श्रद्धा गरोदर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना एक माकडहाडाचा मोठा भाग सापडला आहे. हा भाग श्रद्धाच्या मृतदेहाचा असावा, असा अंदाज असून त्याची तपासणी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना श्रद्धा तिच्या हत्येवेळी गर्भवती असल्याचा संशय आहे. इतक्या वेळानंतर सापडलेल्या हाडांच्या मदतीनं तिची गर्भधारणा निश्चित करणं कठीण आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case : आफताबला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात मदत करणारे १० पुरावे कोणते?

आफताबच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर

घरी किंवा तिच्या मोबाईलवर सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरूनच याची माहिती कळू शकेल की ती खरोखर गर्भवती होती किंवा नाही. अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील नवनवीन गोष्टी पोलीस तपासातून पुढे येत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर नराधम आफताब पुनावाला यानं तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. क्रूरतेचा कळस म्हणजे, श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये असताना आफताब त्याच फ्लॅटमध्ये दुसऱ्या मुलीसोबत रोमान्स करत होता. आफताबनं पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.