Delhi University Election Result : दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ‘ABVP’ने पुन्हा एकदा फडकवला भगवा!

Delhi University Elections 2025 Update : ‘NSUI’च्या वाट्याला अवघी एक जागा; २१ उमेदवारांनी आजमावलं होतं नशीब
ABVP celebrates after winning four seats while NSUI manages one in the Delhi University elections 2025.

ABVP celebrates after winning four seats while NSUI manages one in the Delhi University elections 2025.

esakal

Updated on

ABVP Secures Four Seats in DU Elections : दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत ‘अभाविप’ने चार पैकी तीन पदांवर विजय मिळवला आहे. तर एनएसयूआयच्या खात्यात अवघी एक जागा आली आहे. 

या निवडणुकीत अध्यक्षपदावर (अभाविप)चे आर्यन मान विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदावर नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया अर्थात (एनएसयूआय)च्या राहुल झांसला यांनी विजय मिळवला आहे. सचिव पदावर अभाविपचे कुणाल चौधरी, संयुक्त सचिव पदावर अभाविपच्या दीपिका झा यांनी विजय मिळवला आहे.

दिल्ली निवडणूक २०२५मध्ये एकूण १ लाख ५३ हजार १०० नोंदणीकृत मतदारांपैकी ६० हजार २७२ विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. या निवडणुकीत एकूण ३९.३६ टक्के मतदान झाले. यावेळी एकूण २१ उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. परंतु प्रमुख लढत ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेस समर्थित नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया यांच्यातच झाल्याचे पाहायला मिळाले.

ABVP celebrates after winning four seats while NSUI manages one in the Delhi University elections 2025.
Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

अमित शहांनी केले अभिनंदन -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयाबद्दल अभाविप कार्यकर्त्यांचे अभिनंदन. हा विजय 'राष्ट्र प्रथम' या विचारसरणीवरील तरुणांचा अढळ विश्वास दर्शवितो. हा विजय विद्यार्थी शक्तीचे राष्ट्रीय शक्तीमध्ये रूपांतर करण्याच्या परिषदेच्या प्रवासाला आणखी गती देईल."

ABVP celebrates after winning four seats while NSUI manages one in the Delhi University elections 2025.
US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

अध्यक्षपदी विजयी झालेल आर्यन मान काय म्हणाले ? -

विद्यार्थ्यांना आपला विजय समर्पित करताना आर्यन मान म्हणाले, "मी ही निवडणूक १५,००० हून अधिक मतांनी जिंकलो. मला विजयी करण्यासाठी मतदान करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही मानतो. " तसेच दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था आणि महाविद्यालयांमध्ये एसी आणि पाणी यासारख्या सुविधा पुरवण्याला प्राधान्य दिले जाईल. असंही आर्यन मान म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com