शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट; प्राध्यापकाला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Delhi University Professor Ratan Lal
Delhi University Professor Ratan Lalesakal
Summary

वकील जिंदाल यांनी प्राध्यापक डॉ. रतनलाल यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली होती.

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक रतनलाल (Delhi University Professor Ratan Lal) यांना शनिवारी तीस हजारी न्यायालयानं (TIS HAZARI COURTS) जामीन मंजूर केलाय. ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) सापडलेल्या कथित शिवलिंगाबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी इतिहासाच्या प्राध्यापकाला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानं रतनलाल यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.

सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) वकील विनीत जिंदाल यांनी प्राध्यापक डॉ. रतनलाल यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडं तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राध्यापक रतनलाल यांच्या विरोधात उत्तर दिल्लीतील मॉरिस नगर सायबर सेल पोलिस स्टेशनमध्ये (Morris City Cyber Cell Police Station) कलम 153 ए आणि 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डॉ. रतनलाल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राध्यापकाच्या सुटकेच्या मागणीसाठी डीयू डाव्या विंगच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रात्री मॉरिस नगर सायबर पोलिस स्टेशनबाहेर निदर्शनं केली.

Delhi University Professor Ratan Lal
LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसाचं रिंगमध्येच निधन

काय आहे संपूर्ण प्रकरण

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या वाळूखानामध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदूंच्या बाजूनं करण्यात आला होता. या दाव्यासंदर्भात प्राध्यापक रतनलाल यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून गदारोळ झाला असता, प्राध्यापक रतनलाल यांनीही खुलासा केला.

Delhi University Professor Ratan Lal
शिक्षक भरती घोटाळा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी

प्राध्यापक रतनलाल म्हणाले होते, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आणि इतिहासाचा विद्यार्थी स्वत:च्या मर्जीनं चालतो. ज्या शिवलिंगाबद्दल बोललं जात आहे, ते तुटलेलं नसून कापल्यासारखं दिसत आहे, असं ते म्हणाले होते. प्राध्यापक रतनलाल यांचं हे स्पष्टीकरण काही चाललं नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com