Delhi Elections : दिल्लीत पुन्हा आम आदमी पक्षाचीच सरशी होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 February 2020

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्लीतील लढाईमध्ये पुन्हा आम आदमी पक्षाचीच सरशी होणार असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विजयाची हॅट्‍ट्रिक नोंदवतील असा अंदाज बहुतांश वृत्तवाहिन्या आणि माध्यमसंस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाला आहे. भाजपच्या जागांमध्ये किंचितशी वाढ होणार असून, काँग्रेस मात्र अद्याप सत्तेपासून कोसो दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली - भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्लीतील लढाईमध्ये पुन्हा आम आदमी पक्षाचीच सरशी होणार असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विजयाची हॅट्‍ट्रिक नोंदवतील असा अंदाज बहुतांश वृत्तवाहिन्या आणि माध्यमसंस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून स्पष्ट झाला आहे. भाजपच्या जागांमध्ये किंचितशी वाढ होणार असून, काँग्रेस मात्र अद्याप सत्तेपासून कोसो दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. आजचा दिवस नेत्यांच्या वक्तव्यांमुळे गाजला. सायंकाळपर्यंत ५७ टक्के एवढे मतदान झाले. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान  झाले. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये सत्तारूढ आम आदमी पार्टी ‘आप’ला बहुमत मिळत असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. भाजपला केवळ काही वाढीव जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आता अकरा फेब्रुवारी रोजी मतमजोणी होईल.

माहितीये का ? अरविंद केजरीवालांनी कसं केलं होतं त्यांच्या पत्नीला प्रपोज ?

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झाले. मावळत्या विधानसभेत ‘आप’चे निर्विवाद वर्चस्व होते. काँग्रेसला एकही जागा मिळाली नसल्याने काँग्रेसचे या विधानसभेत अस्तित्व नव्हते. भाजपचे सुरुवातीला केवळ तीन आमदार होते आणि नंतरच्या पोटनिवडणुकीतील एक वाढीव जागा मिळून भाजपची संख्या चार झाली होती. एकेकाळी दिल्लीचे राजकारण केवळ भाजप व काँग्रेसमध्ये विभागलेले होते.

Delhi Elections:अलका लांबा आपच्या कार्यकर्त्यावर गेल्या धावून; मतदान केंद्रावर राडा

परंतु दिल्लीच्या राजकारणात ‘धूमकेतू’प्रमाणे ‘आप’चा प्रवेश झाला व त्यात काँग्रेसची पीछेहाट झाली व ती राजकीय पोकळी ‘आप’ने भरून काढली आहे. गेल्या पाच- सहा वर्षांत दिल्लीचे राजकारण ‘आप’केंद्रित करण्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे कल्याणकारी कारभाराच्या आधारावर त्यांनी दिल्लीतल्या सामान्य नागरिकांची व विशेषतः गरीब वर्गातील जनतेची मने जिंकली आहेत. ‘आप’च्या कल्याणकारी ‘अजेंड्या’चा प्रतिकार करण्यात भाजपला यश येऊ शकले नाही, त्यामुळेच या निवडणुकीत भाजपने धार्मिक ध्रुवीकरण, राष्ट्रीय मुद्दे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व गृहमंत्री अमित शहा यांचे संघटनात्मक कौशल्य यांच्या आधारे ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि अत्यंत टोकाचा असा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपने ताकद लावली
दिल्लीत सव्वा कोटींच्या आसपास मतदार आहेत आणि भाजप- संघपरिवाराने सुमारे सव्वा लाख कार्यकर्त्यांना प्रचारात झोकले होते. पैसा, साधनसंपत्ती यांचा अमाप वापर भाजपने केला. सर्व खासदारांना ७० मतदारसंघ वाटून देण्यात आले होते. एवढे सर्व केल्यानंतरही सर्वसाधारण मतदारांची ‘आप’वरील श्रद्धा ढळू शकली नाही. याउलट केजरीवाल व त्यांच्या ‘टीम’ने धार्मिक ध्रुवीकरण, राष्ट्रवाद या मुद्द्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले. ही निवडणूक विधानसभेची व स्थानिक स्वरूपाची आहे आणि राष्ट्रीय मुद्दे आपल्या अधिकारकक्षेत येत नसल्याने आपल्याला ते विचारात घेण्याची आवश्‍यकता नाही, अशी स्वच्छ भूमिका त्यांनी घेऊन भाजपला अक्षरशः निरुत्तर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi vidhansabha election Aam Aadmi Party will again be the same